breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे. कर्मचाऱ्यांची मोठी संख्येमुळं लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हे मोठं पाऊल उचलले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं त्यात वाढ केली आहे. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टनसिंग पाळले जावे व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button