breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवार सांगतील, त्याच दिवशी राष्ट्रवादीत जाऊ : अनुराधा नागवडे

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील, त्याच दिवशी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करू. यावेळी नागवडे घराण्यास निश्चितच संधी मिळेल, अशी आशा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रवेश करून त्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांचा गट अस्वस्थ झाला आहे.
श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना नागवडे म्हणाल्या की, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून आम्ही चार पावले मागे घेण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात आघाडी मजबूत झाली आहे. आम्ही जनप्रवाहात राहिलो असून मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळत असताना आम्ही नाकारले. लोकसभा निवडणुकीतही पवार कुटुंबीयांच्या शब्दाला मान दिला. पुढील विधानसभा निवडणुकीत नागवडे घराण्यास उमेदवारी देण्याबाबत पवार सकारात्मक निर्णय घेतील.
‘तर वेगळा विचार करू’
विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर वेगळा विचार करावा लागेल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागवडे घराण्याचा उमेदवार पक्षाला द्यावा लागेल, असेही अनुराधा नागवडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button