breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार – शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील एंट्री निश्चित केली आहे. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळणार आहे.

पुणे एमआयटी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोरच्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार बोलत होते. रोहित पवार आणि पार्थ पवार यांनाही यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे पवार कुटंबातून एकाच वेळी चार जण निवडणूक लढणार का, असंही बोललं जात होतं. पण पवार कुटुंबातून मीच निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील प्रतिनिधीत्व करतात. मात्र स्वत: विजयसिंह मोहिते पाटील यांनीच शरद पवारांना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आग्रह धरला आहे. शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. तेव्हापूसन शरद पवार हे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी पुण्यात केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं होतं. पण ते आता पुन्हा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button