breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना, इंदायणी, मुळा नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी 2 कोटी 34 लाखांच्या खर्चाला मान्यता

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. याकामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज मंजुरी दिली आहे. केवळ 8 महिने कालावधीत जलपर्णी हटविणे आणि नदीपात्र स्वच्छतेकामी 2 कोटी 29 लाख 48 हजार 96 रुपये खर्च होणार आहेत. निविदा दरातील तफावत पाहून हे काम मे. साई फ्राईट प्रा. लि. संस्थेला देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून या तिनही नद्या वाहतात. पावसाळा संपून हिवाळा संपलेला असताना नदीपात्र अक्षरष: जलपर्णीने आच्छादले आहे. परिणामी, डासोत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने ही जलपर्णी हटविण्यासाठी अ, ब, ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या नोटिसींनंतर पालिकेने या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. मे. साई फ्राईट प्रा. लि. संस्थेच्या निविदेतील दर इतर निविदाधारकांच्या दरांच्या तुलनेत कमी असल्याने हे काम त्यांना देण्यात आले आहे. यातील खर्चाच्या विषयाला आज स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी मान्यता दिली.

पवना नदी – सांगवडे, किवळे पूल ते दापोडी संगमापर्यंत जलपर्णी काढून स्वच्छ केली जाणार आहे. तर, इंद्रायणी नदी – आयटी पार्क निघोजे पुल ते स्वराज रेसिडेन्सी (कुदळवाडी, चिखली) पर्यंत आणि स्वराज रेसिडेंसी ते डुडुळगाव स्मशानभूमी समोरील पंधारापर्यंत साफ केली जाणार आहे. मुळा नदी – वाकड पुल, पिंपळे निलख स्मशानभूमी, औंध सांगवी ब्रीज ते दापोडी हॅरिस ब्रीज व बोपखेल येथील मनपा हद्दीपर्यंतच्या भागातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. तसेच, खडकी कॅन्टोमेंट हद्दीतील बोपखेल, रामनगर, गणेशनगर आदी भागातील मुळा नदीचे पात्र देखील साफ केले जाणार आहे.

या कामाकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. मे. साई फ्राईट प्रा. लि. यांच्या निविदेचा दर सर्वात कमी असल्यामुळे त्यांच्याशी 8 महिन्यात हे काम करून घेण्यासाठी महापालिकेने करार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button