महाराष्ट्र

पर्यावरण पुरक गणेशमूर्तींचे वाटप; प्रभातफेरीद्वारे वृक्षसंवर्धनाचा जागर*  

उदगीर (प्रतिनिधी) – तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च  माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ८१ पर्यावरणपूरक गणेश मुर्तीं बुधवारी (दि. 12) गावातून प्रभातफेरी काढून ग्रामस्थांना वाटप करण्यात आल्या. सोबत रोपटे भेट देऊन वृक्षसंवर्धनाचा जागर घालण्यात आला.

 

संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या संकल्पनेतून शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक ८१ आकर्षक गणेश मुर्ती तयार केल्या होत्या. गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या गणेश मुर्तींसोबतच वृक्षसंवर्धनाचा जागर घालत ग्रामस्थांना रोपटेही भेट देण्यात आले. या उपक्रमात हरित सेना, महिला दक्षता समिती, परिवहन समिती यांच्यासह शाळेतील शिक्षक व  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

गावातील मुख्य रस्त्यावरून ढोलताशांच्या गजरात पर्यावरण व स्वछतेचा संदेश देत प्रभातफेरी काढण्यात आली. दरम्यान, चौका – चौकांत विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक नाटीका सादर केली. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक  केले. यावेळी जगदिश जाधव, सेक्रेटरी रामकिशन जाधव, प्रा. एम. व्ही. स्वामी, एन. आर लांजे, रसुल दा. पठाण, बी. एस. बाबळसुरे, के. डी. मुडपे, बी. जी. कानपुर्णे, बी. एन. खंदाडे, वर्षा कवडगावे, संजय जाधव आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या प्रभातफेरीची सांगता करण्यात आली.

 

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण संपन्न

नगर परिषद व मौर्या फाउंडेशन व के. शिवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण पूरक गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. पीओपीमुळे पर्यावरणाला धोका आहे, हे सर्वश्रृत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी घराघरामध्ये शाडूमातीच्याच गणेशमुर्तीची स्थापना केली जावी. याचा प्रचार व आग्रह नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केला आहे. यानिमीत्ताने नगर पालिकेच्या सभागृहात व शहरातील टाइम्स पब्लिक स्कूल व पोद्दार पब्लिक स्कूल येथे दिनांक १० व ११ सप्टेंबर रोजी शाडू मातीचे गणपती निर्मीती प्रशिक्षण व स्पर्धाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यशाळा व स्पर्धेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालय व संस्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन पीओपीमुक्त व पर्यावरणयुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. या स्पर्धेत उत्कृष्ठ गणेश मुर्ती बनवणाऱ्या कलाकारांना नगर परिषद उदगीर तर्फे दि. १८ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात पारितोषिक देवून गौरविले जाणार आहे. तसेच, पारितोषिकाचे स्वरूप प्रथम ५ हजार १०१ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आणि द्वितीय ३ हजार १ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय २ हजार १ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच पहिल्या ५० विद्यार्थ्यास प्रोत्साहनपर इको गणेश टी-शर्ट बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेत ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अॅड. दत्ताजी पाटील, नंदकुमार बिजलगावकर, रामेश्वर चांडेश्वरे आदीनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button