breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पर्यावरणपूरक एसी इलेक्ट्रिक बस लवकरच पुणेकरांच्या सेवेत

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त आणि सुखकर व्हावा यासाठी एसी इलेक्ट्रिक बस लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. कारण, पीएमपीच्या ताफ्यात पहिल्या २५ बस समाविष्ट होण्याच्या निविदेस गुरुवारी मंजुरी देण्यात आली. पुण्याच्या पेठांमध्येही सहज प्रवास करू शकतील अशा ९ मीटरच्या २५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट देण्यात आले असून १२ मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रियाही काहीच दिवसांत पूर्ण होईल, अशी घोषणा पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

९ मीटरच्या (३१ सीटर) २५ बस येत्या २६ जानेवारीला पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरातच उपलब्ध होणार आहे. या सर्व बस ‘बीआरटी काँप्लायंट’ आहेत. ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. या बसच्या चार्जिंग तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे, तर पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरूवातीला या लहान बस बीआरटी मार्गावरच धावणार असून निगडी ते भेकराईनगर या बीआरटी मार्गावर ही बस धावणार आहे.

शिरोळे म्हणाले, ‘या बससाठी ४.५ रुपये प्रति किलोमीटर असा नाईट चार्जिंगचा खर्च येणार आहे. तर डे चार्जिंगचा खर्च ६ रुपये प्रति किमी आहे. हे विजेचे शुल्क पालिका भरणार आहे. सध्या सीएनजी नॉन एसी बससाठी प्रत्येक बसला ५४ रुपये ७ पैसे प्रति किमी खर्च येतो. त्यामुळे या बस तुलनेने स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत.

एप्रिलपर्यंत पुढील १२५ बस (१२ मीटर) देखील पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार असून त्या नंतरच्या ३५० बससाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यावरणाच्या दृष्टीने हरित व सामान्यांच्या सोईची व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button