breaking-newsराष्ट्रिय

पर्यटकांसाठी खूशखबर; नव्या मोसमात हिमवृष्टीला सुरुवात

भारताचा स्वर्ग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमातील हिमवृष्टीला ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटनासाठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी ही खूशखबर असून त्यांना हा बर्फवृष्टीचा आनंद लुटता येणार आहे. पीर पंजल तसेच लाहौर-स्पीटी भागातील केयलाँग येथे शुक्रवारी सकाळी बर्फवृष्टीला सुरुवात झाली.

या ताज्या बर्फवृष्टीमुळे येथील डोंगर-दऱ्यांमध्ये मखमली अशी पांढरी चादर अंथरल्याचा अनुभव येत आहे. सकाळचे कोवळे ऊन आणि बर्फ यांच्यामुळे येथील व्हॅलीज आणखीनच खूलून दिसत आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी हा योग्य काळ असल्याने अनेक पर्यटक सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. येथील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळांवरील हॉटेल फुल्ल झाली असून पर्यटकांनी हे प्रदेश फुलून गेले आहेत. दरम्यान, आजच्या ताज्या बर्फवृष्टीने या पर्यटकांच्या चेहऱ्या समाधानाचे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button