breaking-newsपुणेमहाराष्ट्र

परस्पर तहकुबीचा ठराव : आबा बागूल यांना नोटीस पाठवणार

पुणे – येवलेवाडीच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्याचा निर्णय कॉंग्रेसने पक्षीय बैठकीत घेतला असतानाच कॉंग्रेस सदस्य आबा बागूल यांनी गटनेत्याशी चर्चा न करता सभा तहकुबीचा ठराव दिला. या कृत्यामुळे बागूल यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेत अरविंद शिंदे यांनी सांगितले.

येवलेवाडीचा विकास आराखडा महापालिका मुख्यभेत मंजुरीसाठी आला होता. या आराखड्यात अनेक बदल करण्यात आल्याचे, काही आरक्षणे वगळण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरदार सुरू आहे. विरोधी पक्षांनी त्यावर बरेच आरोप केले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने मुख्यसभेत या विकास आराखड्यावर चर्चा करण्याचा निर्णय पक्षाच्या अंतर्गत बैठकीत घेतला होता. मात्र प्रत्यक्षात सभागृहात वेगळेच घडले. मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू असताना त्या गदारोळातच आबा बागूल, दत्ता धनकवडे आणि अविनाश साळवे यांनी सभा तहकुबी दिली. त्याचबरोबर भाजपनेही सभा तहकुबी दिली. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या विषयावर त्वरित निर्णय घ्यावा, असे कारण बागूल, धनकवडे आणि साळवे यांनी दिले आहे.

विकास आराखड्यावर चर्चा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असताना, विरोधी पक्षातील सदस्यांना ही चर्चा का नको होती, याबाबत महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. येवलेवाडीच्या डीपीवर गटनेते नेमकी विरोधी भूमिका मांडणार आहेत की, बाजूने याविषयी संभ्रम निर्माण झाल्याने आणि ऐनवेळी आपल्याला ठराविक भूमिका घेता येणार नाही, हे जाणून या दोघांनी पक्षाच्या विरोधात जाऊन थेट तहकुबीच मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button