breaking-newsपिंपरी / चिंचवड

परवान्यांपेक्षा वाढीव होर्डींग्जवर कारवाई कधी ? महापालिका आकाशचिन्ह विभाग झोपलेलाच

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातही परवान्यापेक्षा अधिक वाढीव होर्डींग्ज व बेकायदेशीर फ्लेक्स लावले आहेत. या होर्डिंग्ज व फ्लेक्स मालकांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड शहरात होर्डींग्ज व फ्लेक्सना राजकीय  वरदहस्त लाभला आहे. पुण्यातील दुर्दैवी घटनेनंतर महापालिका ‘आकाशचिन्ह परवाना विभागाने’ कुठेही कारवाई केलेली नाही. बीपीएमसी कायद्यानुसार अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डींग्ज व फ्लेक्स वर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत.

पुणे येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्येही कधीही घडू शकते, त्यामुळे आपल्या शहरात अशी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, यासंदर्भात तातडीने कारवाई करून शहरातील नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी महापालिका प्रशासन गंभीर आहे, असा संदेश जनतेमध्ये जाण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना निर्गमित करावेत.

अशी कारवाई करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूदही करण्यात यावी. अन्यथा शहरात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास पालिका प्रशासन व प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण व्यक्तिश: जबाबदार राहाल याची गांभीर्याने दखल घ्यावी. या निवेदनांवर मानव कांबळे, प्रदीप पवार, दिलीप काकडे, गिरीधारी लढ्ढा, उमेश इनामदार, अशोक मोहिते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button