breaking-newsक्रिडा

परदेशी लिग्स मध्ये खेळणार भारतीय खेळाडू

नवी दिल्ली – आयपीएलचा हंगाम संपत आला आहे. या हंगामात अनेक परदेशी खेळाडू आपला ठसा उमटवला आहे आणि भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच बरोबर अनेक भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवताना सातत्य राखले आहे. ज्या प्रमाणे भारता आयपीयलचे आयोजन करतात, अशाच टी20 लीग स्पर्धा परदेशातही आयोजित केल्या जातात. मात्र, परदेशातील टी20 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसत नाहीत.

हा केवळ योगायोग नाही, तर बीसीसीआयच्या आणि आयपीएलच्या नियमानुसार हे घडत आहे. याचे कारण बीसीसीआय आणि आयपीएलच्या करारानुसार भारतीय खेळाडूंना देशाबाहेरील टी20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच धोनी, विराट हे खेळाडू बिग बॅश लीग सारख्या मोठ्या परदेशी टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतात.

बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना देशाबाहेरील टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास परवानगी देण्याच्या मुद्‌द्‌यावर पुनर्विचार करत आहे. सध्या आयपीएलमधील विविध संघाकडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना इतर देशातील टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बड्या क्रिकेट मंडळांनी या संदर्भात बीसीसीआयवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

बीसीसीआय आणि आयपीएल त्यांच्या निर्णयावर सुमारे 10 वर्षे ठाम आहेत. मात्र तसे असले तरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बड्या क्रिकेट मंडळांनी भारतीय खेळाडूंना आपल्या टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास पाठवण्याबाबत बीसीसीआयवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या संबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button