breaking-newsपिंपरी / चिंचवड

पदोन्नती दिरंगाईबाबत अधिका-याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

– मुख्यमंत्र्यांनी दिले पुढील कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शासन परिपत्रक क्र, संकीर्ण-2016/प्र क्र, 43/16 नवि-28 दि. 14 नोव्हेंबर 2017 नुसार प्रत्येक महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांचे विषय हाताळण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिकेतील एका उप-आयुक्तावर सोपवावी व त्याची सविस्तर माहिती शासनाला कळवावी. तसेच शासन निर्देशाचे तत्परतेने व काटेकोरपणे पालन होईल, या दृष्टीने संबंधितांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी असे सर्व महानगरपालिका आयुक्त यांना लेखी कळवले आहे.

वरील विषयानुरूप संभाजी ऐवले हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकमेव सहाय्यक आयुक्त पदाकरिता निर्धारित करण्यात आलेली अहर्ता धारन करित आहेत. तसेच याबाबत विधि समितीच्या 2019 च्या विषय समितीमध्ये देखिल संभाजी ऐवले यांना पदोन्नति देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे मनाच्या सर्वोच्च अशा महानगरपालिका जानेवारी 2020 च्या सभेमध्ये देखिल संभाजी ऐवले यांना पदोन्नति देण्याचा ठराव मंजूर केला आहे. ह्या मंजूर ठरावास मान्यता मिळुन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला, परंतु अजुनही सदर पदोन्नति दिली गेली नाही.

वरील गंभीर विषयाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजू भालेराव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वरील विषयाचे सविस्तर पत्र (मेलद्वारे) दि 25 जुलै 2020 रोजी पाठवले. सदर मेलमध्ये पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन तसेच आयुक्त पदोन्नति देण्यास जाणुन बुजुन दिरंगाई करीत असल्याचे नमूद केले असुन संभाजी ऐवले यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे, त्याचप्रमाणे संभाजी ऐवले यांना सहाय्यक आयुक्त पदावरील पदोन्नति देण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

केवळ दोन तासाच्या कालावधीत राजू भालेराव यांच्या मेलवरील तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. आपला ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असुन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागात पाठविण्यात आला आहे, असा उलटटपाली मेल मनसे जनहित कक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजू भालेराव यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या नोंदणी शाळेतुन आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button