breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पदवीधर मतदार संघ निवडणूक : ‘अपक्ष’ उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, शहराध्यक्षांची ‘फौज’

आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या भूमिकेमुळे नाराजी

महाविकास आघाडीकडून आद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणाच नाही

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघातून पिंपरी-चिंचवडमधील नीता ढमाले यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्यासोबत पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे ढमाले या राष्ट्रवादीपुरस्कृत उमेदवार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचा दिवस (दि.१२ नोव्हेंबर) राहिला आहे.  मात्र, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधर मतदार संघातून नेमकी कुणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.

दरम्यान, नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निता ढमाले  या पुणे पदवीधर मतदार संघासाठी तीव्र इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे यांच्या समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. ढमाले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी आमदार बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे रवींद्र ढमाले आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून अद्याप (बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ) अधिकृत घोषणा झालेली नाही. सोलापूरचे उमेश पाटील, कराडचे अरुण लाड यांची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठींनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे असतानाही राष्ट्रवादीचे आमदार, शहराध्यक्ष अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील म्हणतात…

याबाबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पुणे पदवीधर मतदार संघासाठी पिंपरी-चिंचवडमधील उमेदवार असावा, यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी याबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही. पण, पक्षाकडून जो उमेदवार असेल, त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहणार आहे.  नीता ढमाले यांना पक्षाने संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे. पण, ढमाले यांना संधी मिळाली नाही, तर आम्ही पक्षाचेच काम करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button