breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पत्नीचा खून करून थेट पोलीस ठाण्यात हजेरी

महाईन्यूज | पुणे

पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली दिल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या पत्नीवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना प्रथमिक तपासातून मिळाली आहे.

बानू हसनसहाब नदाफ (वय-३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर हसनसहाब (वय-४१) असे आरोपी पतीचे नाव आहे. हसनसहाबने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह झाला होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. यातूनच खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button