breaking-newsमनोरंजन

“पति, पत्नी और वो’च्या रीमेकमध्ये कार्तिक आर्यन

बॉलीवूडमध्ये 2011मध्ये “प्यार का पंचनामा’ चित्रपटातून पर्दापण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आज चित्रपटसृष्टीत सर्वांचा आवडता कलाकार बनला आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला “सोनू के टीटु की स्वीटी’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या यशानंतर कार्तिकला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.

संजीव कुमार याचा 70च्या दशकातील सुपरहिट चित्रपट “पती, पत्नी और वो’चा रिमेक करण्यात येणार आहे. यात मुख्य भुमिकेसाठी कार्तिकला कास्ट करण्यात आले आहे. मुळ चित्रपटात संजीव कुमारशिवाय रंजीत, विद्या सिन्हा आणि षी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाची स्क्रिप्ट कार्तिकला आवडली असून निर्माता या चित्रपटात कोणताही बदल न करता फक्‍त आज परिस्थितीवर तो साकारणार आहेत.

या चित्रपटाची शूटिंग पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्याप चित्रपटातील नायिका निश्‍चित करण्यात आलेली नाही. या चित्रपटाशिवाय कार्तिक आर्यन आणि कृति सैनन हे “लुका छुपी’ चित्रपटात काम करत आहेत. याशिवाय तो इम्तियाज अलीच्या “लव आज कल-2’मध्येही सारा अली खानसोबत झळकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button