breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पक्ष सांगेल त्याच भूमिकेवर ठाम, कोअर कमिटीने मला न्याय द्यावा – विजय उर्फ शितल शिंदे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गेल्या वर्षी स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झालेली असताना पक्षाच्या अटी व शर्तींना अधीन राहून मी राजीनामा दिला होता. या वर्षी स्थायी समिती सभापती पदासाठी मला उमेदवारी देण्याचे निश्चित असताना ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांचे नाव ऐनवेळी पुढे आले. कोअर कमिटीने ठरलेल्या धोरणानुसार निर्णय घ्यावा. माझ्यावर अन्याय झाला आहे. मला पक्षाने न्याय द्यावा, अशी भूमिका भाजपचे नागरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर सोमवारी मांडली.

नगरसेवक शिंदे म्हणाले की, स्थायी समितीमध्ये प्रत्येक सदस्याला एक वर्षाची संधी देण्याचे शहर ‘कोअर’ कमिटीचे धोरण आहे. गतवर्षी एक वर्ष झालेल्या भाजपच्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यावेळी स्थायी समितीत माझी निवड झाली होती. तेव्हा मी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छूक होतो. परंतु, संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील वर्षी आपल्याला राजीनामा द्यायला लागू नये. यासाठी मी गतवर्षी राजीनामा देऊन समितीतून बाहेर पडलो. तसे यावर्षी एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत.

यावर्षी माझी निवड झाल्यानंतर मी अध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छूक होतो. राज्य आणि शहर कोअर कमिटीनेही माझ्या नावाला हिरवा कंदील दाखविला होता. परंतू, ऐनवेळी काय झाले माहिती नाही. कमिटीच्या ठरलेल्या धोरणानुसार गतवर्षी निवड झालेल्या सदस्यांची मुदत संपत आहे, हे कदाचीत पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले नसेल. ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांचे नाव नजरचुकीने आले असेल. माझ्यावर अन्याय झाला आहे. परंतु,  कोअर कमिटी मला न्याय देईल, यावर माझा विश्वास आहे, असेही शिंदे म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button