breaking-newsपुणे

पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही ही मोठी शोकांतिका

  • रामदास आठवले : “गाव तिथे आरपीआयची शाखा’ अधिवेशात होणार घोषणा

पुणे – रिपब्लिकन पक्षाला व्यापक स्वरूप देण्यासाठी “गाव तिथे आरपीआयची शाखा’ अशी घोषणा पुण्यात होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनात करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष एवढा मोठा असूनही आम्हाला एकही आमदार किंवा खासदार निवडून आणता आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. कार्यकर्त्यांनी आता “शायनींग’ करण्याबरोबरच गावपातळीवर जावून काम करावे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा यासाठी मतदारसंघात ताकद उभी करा, असे आवाहन आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राज्यव्यापी अधिवेशन रविवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता आर.टी.ओ कार्याजवळील एस.एस.पी.एम.एस मैदानावर होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक समिती आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बौध्द किंवा दलित वस्त्यांमध्येच आरपीआयची शाखा दिसते. आता ती गावांमध्ये सुरू करून त्यामध्ये सर्व समाजाचा समावेश असावा. ग्रामपंचायती, पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर स्व-बळावर निवडून आणण्याची ताकद निर्माण करावी.

पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हावे अशी अपेक्षा असून, त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. डिझेलचे भाव पेट्रोलच्या बरोबरीला आले आहेत. त्यामुळे भाव कमी झाले तरच सर्वसामान्यांना न्याय मिळेल. वाढते शहरीकरण थांबवण्यासाठी ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्व जाती-धर्माच्या भूमीहिनांना पाच एकर जमीन द्यावी, जेणेकरून त्यांना उत्पन्न मिळू शकेल. ग्रामीण भागातील गरीब, दलित समाजाचे लोक शहरात येतात. त्यामुळे झोपडपट्टी वाढते, आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होते. त्यामुळे सरकारने 2011 पर्यंतच्या झोपड्या कायम ठेवण्यास मान्यता दिली, आणि त्यांना एसआरए अंतर्गत घरे देण्याचे सांगितले. मात्र, 2014 पर्यंतच्या झोपड्या कायम ठेवण्यास मान्यता द्यावी आणि 450 स्क्वेअर फुटाची घरे देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

…………..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या “साफ नियत आणि साफ विकास,’ यावर बोलताना रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीमध्ये कविता रचत “साफ नियत आणि साफ विकास, आणि 2019 मध्ये कॉंग्रेस साफ’. 2019 मध्ये आमचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असा विश्‍वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button