breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘पंतप्रधान मोदी आमचे नेते’, पण… संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे – संजय राऊत

मुंबई – कोविड 19 लसीचा सिरमच्या कामाचा प्रगती अहवाल जाणून घेण्यासाठी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याचे मनपूर्वक स्वागत केले जाते. मोदी हे आमचे नेते आहेत, त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे’, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र आणि पश्चिम बंगलावर दबाव टाकला जात आहे. ते होणार हे माहीत आहे. पण संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रेशर पॉलिटिक्स जे कोणी करत आहेत, त्यांचं स्वागत आहे. जे कोणी हे करतात, कुठं केलं जातं हे सर्व आम्हाला माहीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्थांचा दबाव आणला जात आहे’ अशी टीकाही राऊत यांनी भाजपचा उल्लेख न करता केली.

‘या कारवाईतून ज्यांना कोणाला विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे, वेगळी परंपरा आहे. आता जे चाललं आहे, ही इस्ट इंडिया कंपनीची परंपरा आहे. आपल्याला हवं आहे ते मिळवणं, विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे, त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. विरोधीपक्षांनी आपली शक्ती लोकांच्या कामासाठी लावली पाहिजे’, असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला.

‘पुण्यात सर्वांचं स्वागत केलं जातं. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले आहे. मोदी हे आमचे नेते आहे, त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा कायम आदर आहे’, असंही राऊत म्हणाले.

‘कंगना रणौतच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी  महापौर यांनी सूचक विधान केलं आहे. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होती. बेकायदेशीर बांधकामवरील कारवाई बेकायदेशीर कशी ठरली, यासाठी मी संविधानाची काही पुस्तक शोधत आहे’, असाही राऊत यांनी टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button