breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या सभेत महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची चर्चा

अहमदनगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

‘शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?’ असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे.

दरम्यान, मोदींच्या या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही. तसंच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं गेलं. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे.

युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथं सभा घेणार आहेत. पण या सभेवेळी काळ्या रंगाचं कापड अंगावर असल्या कारणाने अनेक लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button