breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक या देशांच्या राजकीय दौऱ्यावर रवाना झाले. तब्बल 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान युगांडाला भेट देणार आहेत. ब्रिक्‍स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहेत.

रवांडा आणि युगांडाच्या या अधिकृत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान या दोन्ही देशांच्या अध्यक्षांसह द्विपक्षीय बैठका, प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा आणि उद्योजक तसेच भारतीय समुदायाची भेट घेणार आहेत. रवांडामध्ये पंतप्रधान जेनोसाईड स्मारकाला भेट देतील आणि अध्यक्ष पॉल कागने यांनी सुरू केलेल्या “गिरींका’ (प्रति कुटुंब एक गाय) या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेशी संबेधित उपक्रमात सहभागी होतील.

पंतप्रधान युगांडाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांबरोबर पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसेच ब्रिक्‍स शिखर परिषद आणि ब्रिक्‍सशी संबंधित इतर बैठकांमध्येही सहभागी होणार आहेत. ब्रिक्‍स शिखर परिषदेदरम्यान सहभागी देशांसोबत द्विपक्षीय बैठका होणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान संरक्षण, व्यापार, संस्कृती, कृषी तसेच दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार आणि करांरांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button