breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपुजन

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पीपीपी तत्त्वावरील मेट्रोचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या मंगळवारी (दि. १८) सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे उपस्थित होते.

बालेवाडीतील कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. गिरीश बापट म्हणाले, पीएमआरडीएने हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून यापूर्वीच घोषित केला आहे. खासगी विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता हिंंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी-व्यावसायिक मूल्य असलेल्या अंदाजे ३० ते ३५ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हा प्रकल्प ‘बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर मान्यता मिळालेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या २३.३ किमी लांबीचा व २३ स्थानके असलेला मेट्रो रेल चार आॅथोरिटीवाइज म्हणजेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका परिक्षेत्रातून धावणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी रुपये, त्यापैकी जागा भूसंपादनासाठी १८११ कोटी रुपये लागणार आहेत. तसेच केंद्र सरकार २० टक्के (१६०० कोटी) आणि राज्य सरकार २० टक्के (१६०० कोटी) रुपये देणार आहे. मेट्रोच्या २३ स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, क्वाड्रन, डोल्हेर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजी फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, कृषी अनुसंधान केंद्र, सकाळनगर, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विद्यापीठ, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या जमिनीचा स्टेशनसाठी व कारडेपो व त्याच्या सेवारस्त्यासाठी माण येथील जमिनीचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button