breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात युवक काँग्रेसचे ‘रोजगार दो अभियान’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज फेमस चौक, नवी सांगवी व मोरे वस्ती चौक, चिखली येथे “रोजगार दो अभियान” राबवण्यात आले. याप्रसंगी रोजगाराच्या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय “रोजगार दो अभियान समर्थन” क्रमांकावर (7998799854) बेरोजगार युवकांकडून मिस्ड काॅल्स देऊन रोजगार दो अभियानास समर्थन देण्यात आले.

या उपक्रमाची माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले. पण परिस्थिती वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व  सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली. त्यात  वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणजे  बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली.

पंतप्रधान मोदी यांच्या  20 लाख करोडच्या पॅकेजमधून  बेरोजगार युवक, शेतकरी वा लघु-मध्यम उद्यगक्षेत्र, यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. पंतप्रधान मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीच्या आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची स्वत:ची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हातांना काम हवे आहे. रोजगार दो ! या मागणीसाठी युवांनी 7998799854 या क्रमांकावर मिस्ड काॅल द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.”

भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, यश काटे, अर्णव कामठे, प्रथमेश कुंभार, ऋषिकेश खेडकर, मयुर तिखे, रोहित जगताप, अश्विन खामकर आदि उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button