breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट होता !

अहमदाबाद : आयसिस या दहशतवादी संघटनेचा हस्तक उबैद मिर्झा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार होता, तसे त्याने एका अ‍ॅपवर म्हटले होते, अशी धक्कादायक माहिती गुजरात दहशतवादविरोधी पथकाने दिली आहे.

मिर्झा हा व्यवसायाने वकील आहे, त्याला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या कासिमला एटीएसने २५ ऑक्टोबर २०१७ रोजी अंकलेश्वर येथून अटक केली होती. हे दोघेही सूरतचे रहिवासी आहेत. मिर्झा याने १० सप्टेंबर २०१६ रोजी एक संदेश पाठविला, पिस्तूल खरेदी करावयाचे आहे, त्यानंतर मी त्याच्याशी संपर्क करीन असे संदेशात म्हटले होते. मात्र कोणाशी संपर्क करावयाचा त्याचा उल्लेख नव्हता, असे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच मोदींची स्नायपर रायफलने हत्या करू असा संदेश मिर्झाला एका व्यक्तीकडून आला होता, असे आरोपपत्रांत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button