breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान आवास योजनेच्या आवास्तव निविदा काढणा-या अधिका-यांवर कारवाई करा

– विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवड शहरातील निविदा अवास्तव दराने काढण्यात आलेल्या आहेत. त्या प्रकारास जबाबदार असणा-या झोपडपट्टी निर्मुलन पुर्नवसन स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रकल्प सल्लागार शशांक फडके यांच्यासह अन्य अधिका-यांची सखोल चाैकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेतून पिंपरी चिंचवड शहरात अल्प उत्पन्न असणा-या नागरिकांसाठी राबविण्यात आला आहे. यामध्ये च-होली येथील गृहप्रकल्पाचा दर प्रति स्केअर फूट 2846 रुपये, रावेत येथील गृहप्रकल्पाचा दर प्रति स्केअर फूट 2927 रुपये आणि बो-हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचा दर प्रति स्केअर फुट 2500 रुपये देण्यात आलेला आहे.

सदरचे दर अवास्तव आहेत. याबाबत महापालिका हद्दीतील खासगी गृहप्रकल्पाचे सध्यस्थितीच्या बाजारभावापेक्षा जास्त दराने सदर प्रकल्पाच्या निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पाचा चुकीचा डीपीआर काढल्याने महापालिकेचे करोडो रुपयाचे नूकसान झाले आहे. या प्रकारास जबाबदार असणा-या झोपडपट्टी निर्मुलन पुर्नवसन स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी याचे तात्काळ निलंबन करुन खातेनिहाय चाैकशी करण्यात यावी, तसेच प्रकल्प सल्लागार शशांक फडके या सर्वांची केंद्रीय आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चाैकशी करुन कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button