breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

पंकजा मुंडे यांना होम पीचवर जबरदस्त धक्का, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची सपशेल माघार

बीड / महाईन्यूज

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना होम पीचवरच जबरदस्त धक्का बसला आहे. माजलगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सपशेल माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त केल्यावर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने कुतुहलाचा विषय ठरला आहे.

माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती. मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या संधीचा फायदा घेत भाजप गटाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत आणले आणि आपला गड मजबूत केला.

भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे 4, राष्ट्रवादीचे 7, भाजपचा 1 आणि शिवसेनेचे 2 असे 14 संख्याबळ राष्ट्रवादीचे होते. सहाल चाऊस गटाच्या 4 नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकूण संख्याबळ 18 झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button