breaking-newsपुणे

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये आंबेडकर जयंती साजरी

पिंपरी – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, बी. एस. कांबळे, मंजुळा मुदलियार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. बी. एस. कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थीनी प्रणाली मगर हिने केले. तर, अभार इयत्ता नववीतील साक्षी वाघमारे हिने मानले. संविधान प्रस्ताविकेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वत:ला एक अस्मिता आहे. याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीतल्या लोकांना नाही, तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या तो नक्की बंड करून उठेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button