पुणे
न्यू सिटी प्राईट स्कूलमध्ये ज्योतिबा फुले जयंती साजरी
पिंपरी – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मंजुळा मुदलियार, भारत नखाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका किरण जैन व शिल्पा गायकवाड यांनी आभार मानले.