breaking-newsपुणे

न्यूमरेटरचे आर अँड डी सेंटर पुण्यात सुरु

महाईन्यूज | पुणे|

  • अमेरिका स्थित न्यूमरेटरचे भारतातील पहिले सेंटर

अमेरिकेतील न्यूमरेटर, डेटा आणि टेक कंपनी यांनी नुकतेच आपले आर अँड डी सेंटर पुण्यात पुण्यात सुरु करण्यात आले आहे. येत्या २ वर्षांमध्ये न्यूमरेटर ने आपल्या कर्मचाऱ्यांचा कौशल्य विकास करण्याची योजना आखली आहे. न्यूमरेटरचे मुख्यालय शिकागो आयएल येथे असून त्याचे जगभरात १,६००  कर्मचारी आहेत.

न्यूमरेटरचे पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन चीफ प्रोडक्ट ऑफिसर श्री चेतन घई यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यूमरेटरच्या चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर तेरेसा ग्रू, स्नेहा जव्हेरी याप्रसंगी उपस्थित होत्या. न्यूमरेटरचे पुण्यातील कार्यालय द हाईव्ह, बंड गार्डन रोड, हॉटेल शेरेटन ग्रँडच्या बाजूला आहे.

न्यूमरेटरचे आर अँड डी सेंटर पुण्यात सुरु

याविषयी अधिक माहिती देताना चीफ प्रोडक्ट ऑफिसर श्री चेतन घई म्हणाले की, “आमचे नवीन संशोधन व विकास केंद्र पुण्यासारख्या तंत्रज्ञानाने निपुण असलेल्या शहरात स्थापन करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करून आमच्या व्यवसायाचा विकास करणे हे एक लक्षणीय पाऊल आहे. येथे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सेवा व सुविधांचा विकास करून त्यांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्द्द आहोत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button