breaking-newsपुणेराष्ट्रिय

नौदल अधिकाऱ्यांचा भारत यात्रेतून तरुणांशी संवाद

भारतातील तरुणांचा लष्करी सेवेतील सहभाग वाढावा, यासाठी नौदल अधिकाऱ्यांतर्फे भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पंचेचाळीस दिवसांत नऊ हजार किलोमीटरचा टप्पा पार करत नौदल अधिकाऱ्यांनी तरुणाईशी संवाद साधला आणि लष्करी सेवेबाबत जनजागृती केली.

देशवासीयांमध्ये नौदलाच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून तरुणांना नौदल सेवेतील संधी आणि आव्हानांची माहिती करून देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले. तब्बल नऊ हजार किलोमीटरचा प्रवास मोटारीतून पूर्ण करत नौदल अधिकाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली असून तिला देशभरातील तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर के. श्रीनिवासन यांनी दिली.

लोणावळा येथील आयएनएस शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्राच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त सव्वीस मार्च ते नऊ मे या कालावधीत ही मोहीम पूर्ण करण्यात आली. मोहिमेचा समारोप गुरुवारी आयएनएस शिवाजीच्या प्रांगणात झाला. भारतीय नौदलाच्या वतीने एकूण चार विभागात ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या प्रवासात हजारो महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधण्याची संधी नौदल अधिकाऱ्यांना मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button