breaking-newsराष्ट्रिय

नोटाबंदीच्या काळातील ‘ओव्हरटाईम’ परत करा

  • एसबीआयचा 70 हजार कर्मचाऱ्यांसाठी अजब फतवा

नवी दिल्ली -भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) आपल्या 70 हजार कर्मचाऱ्यांसाठी अजब फतवा जारी केला आहे. त्यांना नोटाबंदीच्या काळात देण्यात आलेली ओव्हरटाईमची रक्कम परत करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी एसबीआयमध्ये विलीन झालेल्या बॅंकांशी संबंधित आहेत.

नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि नव्या घेण्यासाठी बॅंकांपुढे ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली होती. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडला. त्यांना अतिरिक्त काम करावे लागले. त्याचा मोबदला म्हणून एसबीआयने कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमची रक्कम दिली. यावर्षी मार्च ते मे या कालावधीत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमपोटी 17 ते 30 हजार रूपये देण्यात आले. मात्र, विलीन झालेल्या बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू नसल्याची भूमिका आता एसबीआयने घेतली आहे. त्यामुळे एसबीआयमध्ये विलीन झालेल्या स्टेट बॅंक ऑफ पतियाळा, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर, स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूरच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमची रक्कम परत करण्यास सांगण्यात आले आहे.

नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 यादिवशी जाहीर करण्यात आला. त्यामुळे जुन्या नोटा बदलून नव्या घेण्यासाठी मोठी लगबग उडाली. त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये वरील बॅंका एसबीआयमध्ये विलीन झाल्या. या पार्श्‍वभूमीवर, विलीन झालेल्या बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम देण्याविषयी एसबीआयने हात झटकले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम देण्याची जबाबदारी त्यांच्या मूळ बॅंकांची होती, असे एसबीआयचे म्हणणे आहे. दरम्यान, ओव्हरटाईम परत करण्याच्या आदेशाबद्दल बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button