नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना हक्काचा शैक्षणिक निधी द्या
– बांधकाम कामगार सेनेचे जयंत शिंदे यांची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक निधीचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे केली. त्यामुळे बांधकाम कामगारांचे पाल्य विविध क्षेत्रात आपले नाव कमवतील असे प्रतिपादनही या वेळी शिंदे यांनी केले.
शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, नोंदित बांधकाम कामगार अनिल बोडके यांची मुलगी ऑस्ट्रेलिया मधे शिकत आहे. नोंदित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वर्षाकाठी १ लाख रूपये शिक्षणासाठी मिळत आहे. मात्र अद्याप बोडके यांच्या मुलीसह अनेकांना हा निधि मिळालेला नाही. कोट्यवधी रूपये बांधकाम कामगार मंडळाकडे पडून असताना देखिल त्याचा वापर होताना दिसत नाही. अनेक मुलांना त्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. हा शैक्षणिक निधी कामगारांच्या पाल्यांना मिळाल्यास त्यांची मुले डॉक्टर, इंजिनियर आदीसह विविध क्षेत्रात नाव कमावतील असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.
या वेळी बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणातील केलेल्या प्रगतिबध्दल जयंत शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.