breaking-newsआंतरराष्टीय

नेपाळच्या नव्या नकाशाला विरोध केल्याने महिला खासदाराला देश सोडण्याची धमकी

काठमांडू : नेपाळ सरकारच्या वादग्रस्त घटना दुरुस्तीला विरोध करणाऱ्या खासदार सरिता गिरी यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. तोडफोड करताना हल्लेखोरांनी त्यांना देश सोडून जाण्याचा इशाराही दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली होती, पण कुणीही त्यांच्या मदतीला पोहोचले नाही. त्यांच्या पक्षानेही त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे. सरिता गिरी यांनी ट्विटरवर या हल्ल्याविषयी माहिती दिली.

विशेष म्हणजे, विवादित नकाशा कायदेशीर करण्यासाठी नेपाळ घटनेत बदल करीत आहे. जनता समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता यांनी याला विरोध केला. त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली आहे, त्यामुळे पक्षही त्यांच्यावर संतापला आहे. नेपाळच्या संसदेत घटनादुरुस्ती प्रस्तावावर आपले मत व्यक्त करण्यासाठी खासदारांनी आपली मत मांडली. खासदार सरिता गिरी म्हणाल्या की, ‘नेपाळ सरकारकडे पुरेसे पुरावे नसल्याने हा दुरुस्ती प्रस्ताव फेटाळावा.’

खासदार सरिता यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सोशल मीडियावर निषेध होत आहे. मानवाधिकार कार्यकर्ते रणधीर चौधरी यांनी ट्विट केलं आहे की, ‘आम्ही आज कोणत्या परिस्थितीत पोहोचलो आहोत. आज खासदारसुद्धा त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत. सरिता गिरी यांच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला, तोडफोड केली. हल्लेखोरांनी त्याच्याविरूद्ध आक्षेपार्ह शब्दही वापरले. आपण याचा निषेध करायला हवा. पण यात शंका आहे की सरकार यात सहभागी होईल’. रणधीर यांनी सरिता यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी नेपाळी भाषेत लिहिले आहे की 40-50 जणांनी त्यांच्या घरावर हल्ला केला आणि मुख्य दरवाजा तोडला’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button