breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

नेटफ्लिक्स करणार लवकरच 10 नविन सिनेमे रिलीज

लॉकडाऊनमध्ये आता थोड्या फार प्रमाणात शिथीलता आणून काही गोष्टींसाठी परवानगी देण्यात आलीा आहे. त्यात मालिका आणि चित्रपटांच्या चित्रिकरणालाही परवानगी देण्यात आली होती. मात्र छोटा पडद्यावरची चित्रिकरणं सुरू झाली असली तरी मोठे पडदे अर्थात थिएटर्स सुरू व्हायचे आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही नुकतंच ट्विट करून या वर्षात काही थिएटर्स उघडणार नसल्याचं सांगतिलं आहे .मात्र यामध्य़े ओटीटी व्यासपीठे मात्र कामाला लागली आहेत. घरबसल्या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागली आहेत. अशात आता नेटफ्लिक्सने १० सिनेमे लोकांसाठी खुले केले आहेत.पण कोणता सिनेमा कधी रिलीज होईल ते मात्र १६ जुलै पर्यंत नेटफ्लिक्स सांगणार आहे.

डिस्ने हॉटस्टारने काही दिवसांपूर्वी आपल्याकडचे ७ सिनेमे जाहीर केले होते. दिल बेचारा, शकुंतला देवी, लक्ष्मी बॉम्ब आदी सिनेमांचा यात समावेश होतो. ही घोषणा झाल्यानंतर या ओटीटीचे प्रतिस्पर्धी असलेलं नेटफ्लिक्स काय करतं याकडे अनेकांचं लक्ष होतं. आता या नेटफ्लिक्सने दहा सिनेमांची यादी जारी केली आहेय याच्यात एके व्हर्सेस एके, गुंजन सक्सेना, लुडो, डॉली किटी और वह चमकते सितारे, गिन्नी वेडस सनी, तोरबाज, इंदु की जवानी, द गर्ल ऑन द ट्रेन, रात अकेली है, यांसह अनुराग कश्यपच्या एका सिनेमाचा समावेश होतो. अनिल कपूर, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, भूमी पेडणेकर, कोकणा सेन शर्मा, राधिका आपटे, नवाजुद्दिन सिद्दीकी, परिणिती चोप्रा आदी अनेक चमकते तारे या सिनेमातून आपल्याला भेटणार आहेत. यात सर्वप्रकारच्या सिनेमाचा भरणा आहे. लो बजेट.. सिनेमांसोबत विविध विषयांचा भरणा या सिनेमांमध्ये असणार आहे. कोणता सिनेमा कोणत्या दिवशी रिलीज होईल ते मात्र 16 तारखेला समजणार आहे.

लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक सिनेमावाल्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. एमेझॉन प्राईमने गुलाबो सिताबो थेट रिलीज तरून धमाका उडवून दिला. ओटीटीवर असलेली गरज लक्षात घेऊन या सिनेमाचा ट्रेलर, प्रोमो बनवण्यात आले होते. त्याला रसिकांचा प्रतिसाद मिळालेला पाहून डिस्ने हॉटस्टारने सात सिनेमांची घोषणा केली. या वर्षासाठी तब्बल एक हजार कोटींची गुंतवणूक हॉटस्टार करणार असल्याचं वृत्त आहे. आता त्याच्या तोडीला नेटफ्लिक्सही उतरलं आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या सातही सिनेमांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरूवात २४ जुलैपासून होणार आहे. सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित दिल बेचारा या सिनेमापासून याची सुरूवात होणार आहे. आता हॉटस्टारने आपल्या तारखा जाहीर केल्या असल्याने नेटफ्ललिक्स कोणत्या ताऱखा देतं हे पाहाणं उत्सुकतेचं ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button