breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदी लंडन मध्ये…

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधी रूपयांचा चून लाऊन विदेशात फरारी झालेला भारतातील हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडन मध्ये असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. त्याचा भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला असला तरी सध्या तो सिंगापुरच्या पासपोर्टवर विदेशात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ निशाल मोदी आणि बहीण पुर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे पासपोर्ट आहेत.

पुर्वीचा नवरा मयंक मेहता याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून तो सध्या न्युयॉर्क ते हॉंगकॉंगच्या फेऱ्या मारीत आहे असेही आढळून आले आहे. ईडीने नीरव मोदीचे वडिल दीपक मोदी बहीण आणि तिच्या पतीला इमेलद्वारे समन्स बजाऊन त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले असले तरी त्या कोणत्याही नोटीशीला त्याने दाद दिलेली नाही. अन्य देशांचे पासपोर्ट मिळवून नीरवचे कुटुंबीय बिनदिक्कतपणे विदेशात मुक्‍तपणे हिंडत असल्याचे दिसून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button