breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

मुंबई : ‘नीट’ (NEET) आणि ‘जेईई-मेन्स’ (JEE-Mains) परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार असून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळापत्रकाची घोषणा केली.

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज (मंगळवार 5 मे) केलेल्या घोषणेमुळे जवळपास 25 लाख उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘कोरोना’च्या संकटकाळात देशभरातील सर्वच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वैद्यकीय प्रवेश इच्छुक उमेदवारांवर अनिश्चिततेचं सावट होतं.

केंद्र सरकारने 16 मार्चपासून देशभरातील विद्यापीठे आणि शाळा बंद करण्याची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने नीट आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या.

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवार 26 जुलै रोजी होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यापूर्वी 5, 7, 8 आणि 11 एप्रिलला नियोजित असलेली ‘जेईई मेन्स’ 2020 परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता याही तारखा बदलल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ आता 18, 20, 21, 22 आणि  23 जुलै या दिवशी होईल. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रलंबित परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही पोखरियाल यावेळी म्हणाले.

JEE-Mains – शनिवार 18 ते गुरुवार 23 जुलै
JEE-Advanced – ऑगस्टमध्ये
NEET – रविवार 26 जुलै

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button