breaking-newsराष्ट्रिय

निर्भया निधीतून सर्व पोलीस ठाण्यांत महिला मदत केंद्रे

निर्भया निधीचा उपयोग देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्रे व सर्व जिल्ह्य़ांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागांच्या  स्थापनेसाठी करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर बलात्कार करून खून  करण्यात आल्याच्या देश हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर २०१३ मध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती. सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा उद्देश हा निधी स्थापन करण्यात होता.

इराणी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मानवी तस्करी विरोधी विभाग हे सर्व जिल्ह्य़ात स्थापन केले जातील तसेच सर्व पोलीस ठाण्याच महिलांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यासाठी संचित निधीचा वापर केला जाणार आहे. महिलांची सुरक्षा वाढवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू त्यात आहे. या निर्णयात पंतप्रधान मोदी यांच्या प्रशासनातील आंतर विभागीय सहकार्याचा आदर्श दिसून येतो. निर्भया निधीतून पोलीस ठाण्यात मदत केंद्रे व सर्व जिल्ह्य़ात मानवी तस्करी विरोधी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यात गृहमंत्री अमित शहा यांनी मोलाचे सहकार्य केले. निर्भया निधीचा यातून  चांगल्या कामासाठी वापर  होईल शिवाय अशा प्रयत्नातून कालांतराने महिला व बाल सुरक्षेचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास वाटतो.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button