breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडी

नियम म्हणजे नियम! मास्कशिवाय फोटो काढल्यामुळे चक्क राष्ट्राध्यक्षालाच अडीच लाखांचा दंड

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी काही नियमही आखून दिले आहेत. मास्कचा वापर न केल्यास दंड ठोठावण्यात येतो. या नियमाच्या आधारे चिलीच्या राष्ट्रपतींना दंड ठोठावण्यात आला. त्यांनी एका महिलेसोबत सेल्फी घेतला. मात्र, त्यांनी मास्कचा वापर केला नसल्याचे समोर आले होते.

चिलीचे राष्ट्रपती सॅबेस्टीयन पिनेरा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. अखेर मास्कचा वापर न केल्याबद्दल राष्ट्रपतींनी माफी मागितली. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती पिनेरा यांनी जवळपास ३५०० डॉलरचा (दोन लाख ५७ रुपये) दंड वसूल करण्यात आला.

राष्ट्रपती पिनेरा यांनी सांगितले की, आपल्या घराबाहेर असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना एका महिलेने सेल्फी काढण्याची विनंती केली. तिच्या विनंतीनंतर सेल्फी काढला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, फोटोमध्ये राष्ट्रपती पिनेरा आणि महिला हे दोघेही मास्कशिवाय असल्याचे दिसून आले. त्यानुसार राष्ट्रपतींना दंड ठोठावण्यात आला.

चिलीचे राष्ट्रपती मागील वर्षीदेखील एका पिझ्झा पार्टीमुळे वादात अडकले होते. न्यूझीलंडमध्येही काही महिन्यांपूर्वी लॉकडाउनच्या काळात एका मंत्र्यावर कारवाई करण्यात आली होती. लॉकडाउनमध्ये हे मंत्री समुद्र किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button