breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी येथील उडडाण् पुलाची महापालिका पदाधिका-यांनी केली पाहणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाची आज शनिवारी सकाळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जून महिन्याच्या १२ तारखेला पालखी प्रस्थान सोहळा नवीन उड्डाण अगोदर संबंधित ठेकेदाराकडून उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या.

यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका सुमनताई पवळे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने आदी उपस्थित होते.

येत्या जूनच्या १२ तारखेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या पालखी सोहळ्याचे नियोजन योग्यरित्या व भाविकांना जाताना कुठलीही अडचण निर्माण होवू नये याकरिता पुलाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे व पालखीच्या दिवशी हा पूल सर्वासाठी खुला करावा, अशी सूचना महापौर ढोरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button