breaking-newsताज्या घडामोडीपुणे

निगडी गावठाण भागाला पालिकेने पाणी पुरवठा करावा – सचिन चिखले

पिंपरी – निगडी प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना होणारा पाणी पुरवठा महापालिकेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी प्रभाग 13 मधील गावठाण भागाला एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या एक वर्षापासून निगडी गावठाण आणि लक्ष्मीनगर भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागामध्ये बैठी चाळ, इमारतींचा भाग असल्यामुळे पहिल्या मजल्यावर पाणी चढत नाही. ते चौथ्या मजल्यावर कधी चढणार? अशा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच आता भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी खंडोबामाळ ही नवीन 600 व्यासाची पाईप लाईन टाकली जात आहे. या लाईनला निगडी गावठाणाचा भाग जोडावा, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button