breaking-newsपुणे

निगडीमध्ये १ मेपासून छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला

निगडी  – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे  १ ते ५ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यानमालेचे ३४ वे वर्ष असून या कालावधीत पाचही दिवस विविध विषयांवरील अभ्यासू व नामवंत वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे, अशी माहिती  भास्कर रिकामे यांनी दिली.
निगडी प्राधिकरणातील सावरकर सदनात दररोज सायंकाळी सात वाजता  व्याख्याने होणार आहेत. १ मे रोजी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व त्रिपुरा राज्याचे प्रभारी सुनील देवधर हे “बदलते पूर्वांचल” या विषयावर मार्गदर्शन करतील. २ मे रोजी सलग ५१ वर्षापेक्षा जास्त काळ पत्रकारितेत निर्भीडपणे अभ्यासपूर्ण लेखन करणारे, आचार्य अत्रे यांच्या मराठा वृत्तपत्रापासून सुरवात करून विविध दैनिके व साप्ताहिकामध्ये लेखन करणारे, ऐंशी लाखापेक्षा वाचक संख्या असलेल्या ‘जागता पहारा’ या एकमेव ब्लॉगचे लेखक भाऊ तोरसेकर हे “संविधान वाचवा – परंतु कोणापासून ?” या विषयावर परखड विचार मांडणार आहेत.
३ मे रोजी वृत्तपत्रातील स्तंभलेखन व प्रसार माध्यमातून दैनंदिन घडामोडींवर अभ्यासपूर्ण लेखन करणा-या लेखिका, स्तंभलेखिका, शेफ्स स्पेशल नावाच्या मराठी इंग्रजी व्ही लॉगवरून, सेच विविध वृत्त वाहिन्यावरील चर्चा सत्रात सहभाग घेऊन प्रभावीपणे मत मांडणा-या व सोशल मिडीयातील  जाणकार शेफाली वैद्य या “सोशल मिडिया – संधी व आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ४ मे रोजी ‘रुरल रिलेशन’ च्या माध्यमातून ‘रुरल बिझनेस डेव्हलपमेंट’ या अनोख्या फंडयाचे जनक व मार्गदर्शक प्रदीप लोखंडे हे “देश बदलतोय मित्रांनो” हा विषय मांडणार आहेत. ५ मे रोजी माजी सैन्य अधिकारी ज्यांनी आपल्या सेवेतील बहुतांश काळ हा बंडखोर, माओवादी यांचा प्रभाव असलेल्या आसाम, अरुणाचल प्रदेश, पठाणकोट या भागात घालविला त्या कॅप्टन स्मिता गायकवाड या “शहरी नक्षलवाद” या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
सावरकर मंडळ दरवर्षी सलग ३४ वर्षे व्याख्यानमालांचे आयोजन करीत आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून विविध सामाजिक, राजकीय व राष्ट्रहिताशी निगडीत मुद्यांना हात घातला जातो. त्यातून लोकांचे प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्य ठेवून केला जातो. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यांनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर रिकामे यांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button