breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नाशिक फाटा चाैक सिग्नल फ्री कधी?

पिंपरी – कासारवाडी येथे उभारलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटून  नाशिक फाटा चाैक सिग्नल फ्री होईल, असे सांगण्यात आले. परंतू, कित्येक दिवस झाले हा चाैक सिग्नल फ्री झालेला नाही. याठिकाणी  नव्याने रॅम्प उभारण्यात आले, तो वाहतूकीसाठी खुलाही करण्यात येणार आहे. आतातरी नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री होणार का?  असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. कासारवाडीहून भोसरीच्या दिशेला, भोसरीहून थेट पिंपळे गुरवला जाण्यासाठी तसेच पिंपळे गुरवहून भोसरीला जाण्यासाठी या पुलाचा उपयोग होत आहे. रेल्वे ट्रॅकसह नदी ओलांडून जाणारा हा एकमेव पूल आहे.

दरम्यान, कासारवाडीहून पिंपळे गुरवकडे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात आला असून, हा रॅम्प पहिल्या मजल्याच्या पुलाला जोडतो. अशाच प्रकारे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, जगताप डेअरी येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वल्लभनगर येथे येण्यासाठी रॅम्प बांधणीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे थेट महामार्गावर येणे शक्य होणार आहे. या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूक सुरळित होऊन हा सिग्नल फ्री मार्ग होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button