breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकच्या ‘या’ बँकेतून ६ महिन्यांसाठी पैसे काढता येणार नाहीत; आरबीआयचे निर्बंध

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नाशिक जिल्ह्यातील इंडिपेन्डेन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता या बँकेतून सहा महिन्यांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. बँकेची सध्याची रोखीची स्थिती पाहता ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. मात्र ग्राहक काही अटींद्वारे बँकेतील रक्कमेतून कर्जाची परतफेड करू शकतात.

आरबीआयने आणखी काही निर्बंध बँकेवर घातली आहेत. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा नूतनीकरण करणार नाहीत. या व्यतिरिक्त ते कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाहीत किंवा कोणतीही रक्कम देऊ शकणार नाहीत. बँक निर्बंधासह आपला बँकिंग व्यवसाय चालवत राहील, असे आरबीआयने सांगितले आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारात नाही तोपर्यंत हे निर्बंध राहतील. बँकेच्या परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल केले जातील, असेही आरबीआयने म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी आरबीआयने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादली होती. 17 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादण्यात आले होते. तसेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता सहकारी बँकेचा परवाना 7 डिसेंबर 2020 पासून रद्द करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button