breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नाराज सिद्धूंचा मंत्रीपदाचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाहीयेतपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच १० जून रोजी सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे. सिद्धूंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना लवकरच आपला राजीनामा देणार असल्याचे ट्विटही सिद्धूंनी केलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद लोकसभा निवडणुकीनंतर समोर आले होते. पंजाबमध्ये सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. याचे खापर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंवर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीला हजर न राहता सिद्धूंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवनंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंसह अन्य नेत्यांची मंत्रीपदे बदलली होती. सिद्धूंकडे नागरी प्रशासन विभाग होता. त्याऐवजी त्यांना ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता. त्यांच्याकडील पर्यटन आणि सांस्कृतिक खातंही काढून घेण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button