breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नाथांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजप ‘अनाथ’ – बच्चू कडू

मुंबई – भाजपमध्ये कायम अन्यायाची शिकार झालेले एकनाथ खडसे यांनी कमळ बाजुला सारून हातात घड्याळ घेतले. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावर बच्चू कडू यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

नाथाभाऊंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्र अनाथ होणार आणि राष्ट्रवादीला नाथ मिळाल्यानं त्यांना चांगले दिवस येतील, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना बच्चू कडू यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊंना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर, वडिलांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू असल्यामुळे मी परळीत आहे, अन्यथा मी सुद्धा नाथाभाऊंच्या स्वागत सोहळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या खडसेंना शुभेच्छा

अजित पवार यांनी सुध्दा एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button