breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नाताळ साधेपणाने साजरा करा, गृहमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : कोरोना महामारीमुळे यावर्षी सण साजरे करण्यास अनेक निर्बंध लादले गेले होते. आता वर्षाखेरीस नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पण राज्यातील कोरोना संकट अजून संपले नाही. त्यामुळे नाताळचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थनाही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पाहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील बालकांनी शक्यतो त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे व नाताळ घरामध्येच साजरा करावा. त्यांची सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button