breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
नाट्य संमेलनासाठी १० कोटींचे अनुदान,अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पात नाट्य संमेलनासाठी १० कोटींचे अनुदान ठाकरे सरकारनं जाहीर केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे हे शंभरावं वर्षे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य संमेलनाच्या निधीत वाढ करुन १० कोटींचे अनुदान देत असल्याचं जाहीर केलं.
जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून २७ मार्च रोजी सांगलीत नाट्य संमेलन सुरू होईल. तर १४ जूनला मुंबईत संमेलनाचा समारोप आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत नाट्य संमेलन वेगवेगळ्या शहरात भरवले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचे अनुदान जाहीर झाले आहे.तर पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटींचे अनुदान जाहीर झाले आहे.