breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना काय आपेक्षित आहे, त्यानुसार काम करणार – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक देशपातळीवर आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या शहराकडे आहे. या शहराच्या भविष्याचा विचार करुन अधिकाधिक लोकाभिमुख विकास प्रकल्प आणि उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचा मानस आहे. मला काय करायचे आहे, यापेक्षा पिंपरी-चिंचवडकरांना माझ्याकडून काय आपेक्षित आहे, याचा विचार करून विकासाला प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन, असा विश्वास नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार श्रावण हर्डीकर यांच्याकडून राजेश पाटील यांनी आज स्विकारला. त्यानंतर आयुक्त पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पुर्वी, महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या परिचय बैठकीत अधिका-यांसमवेत संवाद साधला. प्रशासनाने सामान्य नागरिकासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून काम केले पाहिजे. प्रशासनामध्ये एकट्या व्यक्तीकडून काम करणे शक्य होत नसते. यासाठी टीमवर्कची नितांत गरज असते, असे नमूद करुन आयुक्त पाटील यांनी नमूद केले.

कोणत्याही कामामध्ये स्वयंप्रेरणेने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक कामामध्ये नाविन्यता शोधली पाहिजे. जागतिक पातळीवर सध्या कशाप्रकारे उपक्रम अथवा विकास प्रकल्प राबविले जातात, याची माहिती घेऊन प्रत्येकाने आपापल्या विषयात अपडेट असले पाहिजे. नवीन पिढीच्या गरजा ओळखून भविष्यातील उत्कृष्ट शहराची उभारणी आपल्याला करायची आहे. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आपले योगदान द्यावे. सामान्य नागरिकांसाठी आपण काम केले पाहिजे. चांगले काम करणा-याच्या पाठीशी मी निश्चितपणे असेल, मात्र, जाणीवपूर्वक कामकाजात चुका अथवा दिरंगाईने काम करणा-यांना कदापीही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय कामकाज हे पेपरलेस करण्यावर भर राहिल. त्यासाठी प्रत्येक विभागाचे कामकाज ऑनलाईन कसे ठेवता येईल, त्यासाठी प्रयत्न राहिल. त्यामुळे नागरिकांना सुध्दा ऑनलाईन फिडबॅक घेणे सोयीचे ठरेल, असेही आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.

बैठकीत नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील तसेच नव्याने अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विकास ढाकणे यांचे अधिका-यांनी स्वागत केले. परीचय बैठकीस अतिरिक्त आयुक्त अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील, नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, अशोक भालकर, संजय खाबडे, रामदास तांबे, प्रविण लडकत, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपायुक्त सुभाष इंगळे, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button