breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसने आवाज उठवावा – सचिन साठे

पिंपरी, (महा ई न्यूज) – वाढती महागाई, मुलींवरील अत्याचार, मुली-महिलांची असुरक्षितता, बेरोजगारी आदी प्रश्नांवर शहरातील युवक काँग्रेसने आवाज उठवून आंदोलन करावे, असे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने आयोजित मासिक बैठकीत साठे बोलत होते. यावेळी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयुर जैयस्वाल, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, कबीर मोहम्मद, युवक कॉंग्रेसचे चंद्रशेखर जाधव, शैलेश अनंतराव, जिफीन जॉनसन, परमेश्वर पांचाळ, दिपक जाधव, वैभव किरवे, व्यंकट जाधव, संतोष साळवी, आशिष गालफाडे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा समाजातील सर्व घटकांना, सर्व धर्मियांना बरोबर घेऊन काम करणारा देशातील सर्वांत जुना राष्ट्रीय पक्ष आहे. युवक कॉंग्रेसमध्ये घडणा-या कार्यकर्त्यांनाच पुढे पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी मिळते. युवकांनी समाजात घडणा-या अन्याय, अत्याचाराविरोधात संघटन उभारुन जनजागृती करावी. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, दरवर्षी एक कोटी नवीन रोजगार, महागाई व पेट्रोल डिझेलचा दर कमी करुन शेतक-यांना हमीभाव देणे, प्रत्येकांच्या बँक खात्यात पंधरा लाख भरणे अशी फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकविण्यासाठी युवकांनी कामाला लागावे, असेही सचिन साठे म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button