breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नागपूरमध्ये शाळा १४ डिसेंबरपासून सुरू होणार

नागपूर – कोरोनामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत सूतोवाच केले असून, १४ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

वाचा :-देशात 24 तासांत 32,981 नवे कोरोना रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, पोलीस यंत्रणेतील सर्व वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न पुढे आला. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा :-उर्मिला मातोंडकर म्हणते : सिनेमात काम करणारच नाही असेही नाही, पण…

तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिक्षकांनी अतिशय सकारात्मकपणे शाळा सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी सार्वत्रिक भावना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम, अटी पाळून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळांमध्ये शिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button