breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदेडमध्ये भाजपला गळती बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल

नांदेड – गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये इनकमिंग सुरू होते. विधानसभेच्या निवडणुकीतही अनेकांनी पक्षबदल करत भाजपला जवळ केेले होते. मात्र, राज्यात सत्तांतर होताच भाजपमधून गळती सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता भाजपचे नागनाथ घिसेवाड यांनीही भाजपला अलविदा म्हटलं आहे. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.

वाचा :-चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टाळलं, पण शरद पवारांवर सोडले टीकास्त्र

नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये येण्याने नांदेड काँग्रेसला उभारी येणार आहे. भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

वाचा :-राज्यात २४ तासांत थंडीचा कडाका वाढणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button