breaking-newsराष्ट्रिय

नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी कुठलेही आयडी प्रुफ पुरेसे

नवी दिल्ली –आधार कार्ड अभावी कुठलाही ओळखीचा पुरावा (आयडी प्रुफ) नव्या मोबाईल कनेक्‍शनसाठी पुरेसा असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र किंवा वाहन परवाना यांसारख्या आयडी प्रुफच्या आधारे दूरसंचार कंपन्या नवे सिम कार्ड जारी करू शकणार आहेत. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी याबाबतची माहिती दिली.

नियमानुसार कुठल्याही आयडी प्रुफ किंवा पत्त्याच्या पुराव्यावर नवे मोबाईल कनेक्‍शन दिले जाऊ शकते. त्या नियमात बदल झालेला नाही. वैध आयडी आणि ऍड्रेस प्रुफ असणाऱ्याला दूरसंचार कंपन्या नवे सिम कार्ड नाकारू शकत नाहीत. आधारशी संबंधित मोबाईल ग्राहकांच्या रि-व्हेरिफिकेशनबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करेल, असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button